Ads

--

भाजपाकडून भ्रष्ट व्यक्तीला मुख्यमंत्रीपद..

By Xtralarge News

May 9, 2026 1:28 pm

Ads

भाजपाकडून भ्रष्ट व्यक्तीला मुख्यमंत्रीपद..

मुंबई, दि. ९ मे २०२६..

भाजपने भ्रष्ट अशा व्यक्तीला मुख्यमंत्रिपदी बसवण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले शुभेंदू अधिकारी यांनी २०२० ऑन कॅमेरा पैसे घेतल्याचे VDO सर्वत्र झळकले होते. त्याच भ्रष्ट व्यक्तीला भाजपाने आज मुख्यमंत्रीपद बहाल केले आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, २०२० च्या दरम्यान एक स्टिंग ऑपरेशन झाले होते आणि तृणमूल काँग्रेसच्या ५ खासदारांना ऑन कॅमेरा पैसे स्वीकारताना दाखवण्यात आले, त्यात शुभेंदू अधिकारी होते. याच शुभेंदू अधिकारी यांच्यावर ईडीच्या आणि अँटी करप्शनच्या धाडी केंद्राने टाकल्या त्यानंतर शुभेंदू अधिकारी हे तृणमुल काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले. भाजपामध्ये आले आणि वॉशिंग मशीनमध्ये धुतले पण तो डाग अजूनही स्वच्छ झालेला नाही.

भ्रष्ट व्यक्तीला मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने भ्रष्टाचारांना सत्ता देण्याची आपली परंपरा राखली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असेही संजय राऊत म्हणाले..

 

No comments to show.

Leave a Comment