Ads

-

दहावीच्या निकालात यंदाही मुलीच अव्वल.

By Xtralarge News

May 9, 2026 1:15 pm

Ads

दहावीच्या निकालात यंदाही मुलीच अव्वल.

मुंबई, दि. ९ मे २०२६..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात सुमारे २ टक्क्यांची घसरण झाली आहे. यावर्षीही मुलींनीच बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६% आहे तर मुलांची ८९.५६% आहे, मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.४०% ने जास्त आहे.

कोकण विभाग ९७.६२% निकालासह अव्वल ठरला आहे, तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (८८.४१%) लागला आहे.नियमित विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०९% आहे. एकूण १५ लाख ५५ हजार २६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. राज्यातील एकूण २३ हजार ६९८ माध्यमिक शाळांपैकी ६ हजार ६१२ शाळांचा निकाल १००% लागला आहे.एकूण नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १६ लाख १६४ विद्यार्थी परीक्षेस प्रत्यक्षात प्रविष्ट झाले होते, त्यापैकी एकूण १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख २२ हजार ८५१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, तर ४ लाख ८२ हजार २६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात मार्कशिट मिळेल. मूळ मार्कशिट विद्यार्थ्यांना शाळेतच मिळेल. निकाल लागल्याने अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे.

No comments to show.

Leave a Comment