Ads

--

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारी..

By Xtralarge News

May 8, 2026 6:49 pm

Ads

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारी..

कोलकाता, दि. ८ मे २०२६..

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून सुवेंदू अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

भाजपसोबतची सुवेंदू अधिकारी यांची राजकीय कारकीर्द जवळपास सहा वर्षांची आहे. या सहा वर्षांच्या काळात, पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी एक अत्यंत प्रभावी शक्ती म्हणून ते सिद्ध झाले आहेत. काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करणारे सुवेंदू अधिकारी, पश्चिम बंगालमधील सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहचले आहेत.

शूभेंदू यांनी विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात रस घेण्यास सुरुवात केली. त्यांनी तृणमूल काँग्रेसला (TMC) उभारी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २०१६ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली आणि ते ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात परिवहन मंत्री झाले. २०२० मध्ये सुवेंदू अधिकारी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. केवळ तीन जागांवरून भाजपने २०२१ च्या निवडणुकीत ७७ जागा मिळवल्या आणि २०२६ मध्ये २०७ जागांसह पूर्ण बहुमत मिळवले. सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना त्यांच्या पारंपारिक भवानीपूर येऊन लढण्याचे आव्हान दिले. ही लढत प्रतिष्ठेची झाली आणि सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा पराभव करून इतिहास घडवला होता.

No comments to show.

Leave a Comment