Ads

--

तामिळनाडूचे राज्यपाल भाजपचे एजंट.

By Xtralarge News

May 8, 2026 1:29 pm

Ads

तामिळनाडूचे राज्यपाल भाजपचे एजंट.

चेन्नई, दि. ७ मे २०२६.

तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीत विजय थलपतीच्या TVK पक्षाने १०८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनला आहे, काँग्रेसच्या ५ जागा आहेत, त्यांनी विजयच्या पक्षाला पाठिंबा दिला असून साध्या बहुमतासाठी आणखी ५ जागांची गरज आहे. सत्तास्थापनेसाठी थलपती विजय यांनी राज्यपालांची दोनवेळा भेट घेतली पण राज्यपालांनी मात्र त्यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले नाही.

आधी बहुमताचा आकडा दाखवा नंतरच सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देऊ अशी भूमिका राज्यपाल राजेंद्र आर्लेकर  यांनी घेतली आहे. राज्यपालांच्या या भूमिकावर आता सर्वच स्तरातून टीका केली जात आहे, बहुमत सिद्ध करण्याचे ठिकाण विधानसभा आहे राज्यपाल नाही. इतर कोणत्याही पक्षत्र वा आघाडीने सत्तास्थापनेचा दावाही केला नाही अशा परिस्थितीत विजय यांच्या पक्षाला सत्ता स्थापन करण्यास सांगितले पाहिजे. बहुमताचाच प्रश्न असेल तर याआधी भारताली इतर राज्यात अल्पमतातील सरकार स्थापन झालेली आहेत व ती पाच वर्ष टिकलीही आहे.

कर्नाटकात २०१८ साली भाजपाच्या येदियुरप्पा यांच्याकडेही बहुमताचा आकडा नव्हता तरीही राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापन्याचे निमंत्रण दिले होते. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही स्पष्ट बहुमत नसताना त्यांनाही सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. एवढेच काय तर अटलबाहारी वाजपेयी, नरसिंह राव यांच्याकडेही बहुमत नव्हते त्यांनाही सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिलेले होते. नियमानुसार विजय यांच्या पक्षाने दावा केला असल्याने व अतर कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नसल्याने त्यांना आमंत्रण द्यायला हवे होते.

द्रमुकचे नेते व माजी मुख्यमंत्री एम के, स्टॅलिन, कमल हसन यांनीही विजय यांना सरकार स्थापन करु द्यावे असे म्हटले आहे. पण विजय यांना जर बहुमत नसताना सरकार स्थापन करण्यास संधी दिली तर ते घोडबाजार करतील अशी शंका राज्यपाल यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. “राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे भाजपचे एजंट आहेत “,असा आरोप ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि माजी मंत्री कपिल सिब्बल यांनी केला आहे.

No comments to show.

Leave a Comment