Ads

--

कोण बनेल केरळचा मुख्यमंत्री ?

By Xtralarge News

May 7, 2026 5:23 pm

Ads

कोण बनेल केरळचा मुख्यमंत्री ?

मुंबई, दि. ७ मे २०२६..

केरळमध्ये काँग्रेसप्रणीत UDF च्या विजयानंतर, आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्रीपदाकडे लागून राहिले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे आघाडीवर मानले जात आहेत. सुमारे ४३ आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. तर विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलेल्या व्ही. डी. सतीशन यांच्याकडे ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे तिसरे दावेदार रमेश चेन्निथला यांच्याकडे २२ आमदारांचा पाठिंबा आहे.

केरळमधील विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी काँग्रेस पक्षाने मुकुल वासनिक आणि अजय माकन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. काँग्रेसच्या ‘हाय कमांड’ने केरळ काँग्रेसकडून घेतलेल्या अभिप्रायातून, व्ही.डी. सतीशन यांच्या बाजूने अधिक भक्कम पाठिंबा असल्याचे संकेत मिळत आहेत. तथापि, हायकमांडशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे सध्या के. सी. वेणुगोपाल हेच या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. वेणुगोपाल यांनी या शर्यतीतून माघार घेतली, तर VD सतीशन हे केरळचे नवे मुख्यमंत्री बनू शकतील.

केरळमध्ये १० वर्षांनंतर पुन्हा सत्तेवर आलेल्या काँग्रेसने LDF चा दारुण पराभव केला आहे. मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी काँग्रेसने गुरुवारी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. ही बैठक तिरुवनंतपुरम येथील, केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे मुख्यालय असलेल्या ‘इंदिरा भवन’ येथे पार पडेल.या बैठकीत विधिमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाईल. सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागून राहिले आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने ६३ जागांवर विजय मिळवला आहे.याव्यतिरिक्त, निवडणुकीत विजयी झालेल्या अनेक अपक्ष उमेदवारांनीही पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

No comments to show.

Leave a Comment