Ads

--

सुनेत्रा पवार २ लाख १८ हजारांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी..

By Xtralarge News

May 5, 2026 5:11 pm

Ads

सुनेत्रा पवार २ लाख १८ हजारांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी..

बारामती, दि. ५ मे..

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी रेकॉर्ड ब्रेक २ लाख १८ हजार ९३० इतक्या मताधिक्याने विजयी मिळवला आहे. त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांचा धुव्वा उडला आहे. एकाही उमेदवाराला हजारापेक्षा जास्त मतेही पडली नाहीत, विरोधातील सर्व उमेदवरांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अजित पवार यांच्या २०१९ मधील मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड मोडीत सुनेत्रा पवार यांनी नवा विक्रम केला आहे. देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांनी केला आहे.या आधी उत्तर प्रदेशमधील सुनील कुमार शर्मा हे २०२२ साली २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजयी झाले होते.

विजयानंतर ‘एक्स’ वर पोस्ट करत सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बारामतीकरांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित आहे. बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानतानाच हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची..! असे म्हटले आहे. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नये किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया अशी विनंती सुनेत्रा अजित पवार यांनी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment