Ads

--

MPSC उमेदवारांना मिळणार उत्तरपत्रिका!

By Xtralarge News

October 7, 2020 5:31 pm

Ads

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर:

एमपीएससी परीक्षेतील उमेदवारांना परीक्षेमध्ये मार्कसची अचूक माहिती व्हावी व त्याबाबत कोणतीही शंका त्यांच्या मनात राहू नये, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा संबंधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
एमपीएसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या सर्व परीक्षांकरिता उमेदवारांना दोन भागांची उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात येते. त्यापैकी भाग-१ (मूळ प्रत) हा परीक्षेनंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा करण्यात येतो, तर भाग – २ (कार्बन प्रत) परीक्षेनंतर सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आली आहे. उमेदवाराने परीक्षेच्या वेळी त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेवर आयोगाच्या सूचनांनुसार व उत्तरपत्रिकेच्या मलपुष्ठावर सविस्तरपणे दिलेल्या सूचनांनुसार नोंदवणे गरजेचे आहे. उत्तरपत्रिकेच्या भाग २ वरून उमेदवारांना त्यांनी छायांकित केलेली उत्तरे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या उत्तरतालिकेशी पडताळून पाहता येतात. त्यामुळे उमेदवारांना गुणांचा अंदाज घेता येतो. मात्र उमेदवारांना त्यांचे गुण अचूक ज्ञात व्हावेत व उमेदवारांना परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांसंदर्भात कोणती शंका राहू नये म्हणून उमेदवारांना परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाइलमध्ये उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी दिली जाणार आहे.’
१ ऑक्टोबर २०२० नंतर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा तसेच चाळणी परीक्षांपासून हा निर्णय लागू राहणार आहे.

No comments to show.

Leave a Comment