Ads

-

KEM रुग्णालयाच्या कर्मचा-यांना बेदम मारहाण.

By Xtralarge News

April 28, 2026 5:23 pm

Ads

KEM रुग्णालयाच्या कर्मचा-यांना बेदम मारहाण.

मुंबई, दि २८ एप्रिल  –

रुग्ण दगावला म्हणुन त्याचा राग केईएमच्या कर्मचा-यांवर काढण्यात आला. नातेवाईकांनी एका नर्ससहीत दोन सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. त्यात नर्स गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा निषेध म्हणुन KEM च्या नर्स विभागाने कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण दगावला. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी कर्मचा-यांना बेदम मारहाण केली. त्यात एक नर्स व दोन सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण केली. २० ते २५ नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत नर्सला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याचा निषेध म्हणुन KEM रुग्णालयाच्या स्टाफने रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु केले आहे. आज सकाळ पासून हे आंदोलन सुरु असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच महिला कर्मचा-यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments to show.

Leave a Comment