Ads

-

ठाण्यातील गोवण जमिनीचा अहवाल सादर करा..

By Xtralarge News

April 23, 2026 10:03 pm

Ads

ठाण्यातील गोवण जमिनीचा अहवाल सादर करा..

मुंबई, दि. २३ एप्रिल :

कोलशेत (ठाणे) येथील शासकीय गोवण जमिनीवरील अतिक्रमणांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी दिले. सदर जमिनीची मोजणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी महसूल व मनपा अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

ठाण्यातील कोलशेत भागातील शासकीय गोवण जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ती अतिक्रमणे निष्कासित करून, जमीन सार्वजनिक वापरासाठी शासन निहित करण्याची मागणी करणारे निवेदन अजीत नथुराम पाटील यांनी सादर केले होते. त्यानुसार विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे महसूल, ठाणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व ठाणे जिल्हा भूमिअधीक्षक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीमध्ये सर्व विभागानी आपली बाजू उपाध्यक्ष बनसोडे यांच्यासमक्ष मांडली. त्यानुसार याप्रकरणी कायदेशीर निर्णय घेण्यासाठी सदर जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करावी. या प्रकरणाशी संबंधित सर्व विभागानी याप्रकरणी सखोल चौकशी करावी. तसेच जमिनीची प्रत्यक्ष मोजणी व कागदपत्रांची पडताळणी करून तपशीलवार अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिले.

 

No comments to show.

Leave a Comment