कांद्याला खर्च २,२०० आणि भाव ९०० ते १,३०० रुपये!
सांगली, दि. १५ एप्रिल:-
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यात पूर्णपणे विस्कळीत झाली असून होर्मूजची सामुद्रधुनी अद्याप बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ₹२,२०० इतका उत्पादन खर्च येतो पण बाजारात शेतकऱ्यांना मिळतो फक्त ₹९०० ते ₹१,३०० दर, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे असे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, एकीकडे युध्दामुळे निर्यात बंद झाली आहे तर दुसरीकडे काढणीस आलेले पीक अवकाळी पावसामुमुळे नष्ट झाले आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करून कांदा निर्यातीसाठी प्रयत्न वाढावेत आणि शेतकऱ्यांना योग्य हमीभाव जाहीर करावा असे आवाहन केले आहे.
Leave a Comment