गद्दार मिलींद देवरा, ‘उघडा डोळे बघा नीट’ !
मुंबई, दि. १४ एप्रिल २६ :
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या अंत्यसंस्कारास काँग्रेसचे नेते उपस्थित नव्हते असे X या सोशल मीडियावर पोस्ट करणा-या शिंदेसेनेच्या राज्यसभा खासदार मिलींद देवरा यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांनी पुराव्यासह उघडे पाडले व मिलींद देवरा हे लाचार असल्याचा सणसणीत टोला हाणला आहे.
काँग्रेसच्या श्रीनिवास बिक्कड यांनी खासदार मिलिंद देवरा यांना उत्तर देताना आपल्या X वर पोस्ट मध्ये म्हटले आहे की, “गद्दार म्हणून हिणवल्या जाणाऱ्या शिंदे गटाकडे भीक मागून खासदारकी मिळवलेल्या मिलिंद देवरांच्या डोळ्यावर लाचारीची पट्टी बांधल्याने त्यांना आपल्या वडिलांचे सहकारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, CWC सदस्य व माजी मंत्री नसीम खान, खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे अनेक पदाधिकारी यांनी आशाताई भोसले यांचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिलेली दिसली नाही.
विविध (TV) वृत्तवाहिन्यांवरून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने ही दृश्ये पाहिली पण मिलींद देवरा लाचारीत व्यस्त असल्याने त्यांनी ते पाहिले नसेल. देवरा कुटुंबाचे राजकीय अस्तित्व काँग्रेसमुळेच निर्माण झाले, हा इतिहास विसरून कृतघ्न आणि निर्लज्ज विधानं करून मिलींद देवरा स्वतःचीच पातळी उघड करत आहेत, असा हल्लाबोल श्रीनिवास बिक्कड यांनी केला आहे..
Leave a Comment