Ads

--

बारामती अजित पवारांचा श्वास..

By Xtralarge News

April 7, 2026 1:00 pm

Ads

बारामती अजित पवारांचा श्वास..

बारामती, दि. ७ एप्रिल –

बारामती हा केवळ मतदारसंघ नसून अजित पवारांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. ही निवडणूक माझी वैयक्तिक नसून अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक बारामतीकरांची आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदार संघातील महायुतीचा सर्वपक्षीय कार्यकर्ता मेळावा कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआय, रयत क्रांती संघटना, भीमशक्ती रिपब्लिकन सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन महिन्यापूर्वी आपण सर्वांनी अजित पवारांना गमावले, ही केवळ माझ्या कुटुंबाची नाही, तर संपूर्ण बारामतीची मोठी हानी आहे. अजित पवारांचे जाणे बारामतीकरांना पोरके करून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत ही पहिलीच निवडणूक होत असून त्यांच्या विकास दृष्टीला पुढे नेण्यासाठी आपली साथ अत्यंत आवश्यक आहे, अशी हाक सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली.

बारामती शहर हे जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे दादांचे स्वप्न होते. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, मात्र त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिकपणे काम करणे ही, आपली सर्वांची जबाबदारी आहे. संपूर्ण बारामती हे माझे कुटुंब आहे, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी मेळाव्यात व्यक्त केल्या.

अजित पवरांचा जनता दरबार जसा सर्वांसाठी खुला होता, तसाच तो पुढेही कायम ठेवत प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत राहणार असे सांगतानाच शहरात बेकायदेशीर व जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या कोणत्याही गोष्टींना थारा दिला जाणार नाही. दादांनी सुरू केलेले सर्व विकासकामे पूर्णत्वास नेण्याचा माझा निर्धार आहे, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

गेली अनेक वर्षे अजित पवारांनी ज्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या, त्याच समर्पणाने आता बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना शब्द दिला.

No comments to show.

Leave a Comment