मुंबई आणि महाराष्ट्रात RPI ची ताकद वाढता..
मुंबई दि. ३० मार्च –
रिपब्लिकन पक्षाची देशभर घोडदौड सुरु आहे. नागालँन्ड सारख्या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे २ आमदार निवडुन आले आहेत. मणिपुरमध्ये पक्षाला १७ टक्के मतदान मिळुन पक्ष मान्यता प्राप्त झाली आहे पण मुंबईत मात्र रिपाइंच्या उमेदवारांना मतदान मिळत नाही. अनेक वॉर्डात आपला पाठिंबा नसला तरी मित्र पक्षाचे उमेदवार निवडुन येतात. एकेकाळी मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे १२ नगरसेवक निवडुन आले होते, मुंबईचे महापौरपदही रिपब्लिकन पक्षाला मिळाले होते. आता मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्ष कुठे आणून ठेवलाय याचे आत्मपरिक्षण करावे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले.
ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चार पावले मागे येवुन तरुण पिढीला संधी दिली पाहिजे. दलित पँथरसारखी तरुणांची फौज उभी केली पाहिजे.युती झाली नाही तरी स्वबळावर उमेदवार निवडुन आणता आले पाहिजे. केवळ बौध्दांच्या मतांवर उमेदवार निवडुन येणार नाहीत. सर्व समजाला सोबत घेवुन मुंबईत रिपब्लिकन पक्षाची मजबुत पुर्नबांधणी करा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
चेंबुर येथील फाईन आर्ट सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हयाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या पुढाकारातुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना रामदास आठवले बोलत होते.
मी राज्यात कॅबिनेट मंत्री होतो, त्यानंतर मी तीनवेळा लोकसभेत निवडुन आलो. आता राज्यसभेत तीनवेळा निवडुन आलो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मी तीनवेळा राज्यमंत्री झालो आहे. मी कुणाला मागायला गेलो नाही, राजकारणात मागुन मिळत नाही. माझ्या पाठिशी गोरगरीब जनता, झोपडीवासी, दलित, बहुजन, आदिवासी सर्व महाराष्ट्राने मला ताकद दिली म्हणुन मी दिल्लीचे तख्त गाठु शकलो. राज्यात एकही असे गांव नसेल जिथे माझा संपर्क झालेला नाही. संपूर्ण देशात मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष पोहचवला आहे. मला एकटयाला सत्ता नको, माझ्या सहका-यानाही सत्तेत सहभाग दिला पाहिजे मात्र माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नाही.
आपण तळागाळातील जनतेशी संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. सतत लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळत राहिला पाहिजे. तसे होत नाही त्यामुळे कदाचित राज्यात माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नसेल. मुंबईत आणि राज्यात पक्षाची प्रचंड ताकद आहे. ती जागृत केली पाहिजे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
Leave a Comment