परिवहन विभागात बदली आणि वसुलीचे मोठे रॅकेट.
मुंबई, दि. २६ मार्च २६ –
काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. RTO विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी एक मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
परिवहन विभागातील निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या संपूर्ण रॅकेटचे सूत्रधार असून, वसुलीसाठी त्यांनी समांतर यंत्रणा उभी केली असून, राज्यात १०० रुपये वसुली झाली तर ९० रुपये स्वतः घेतात, असा धक्कादायक आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोटर वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांच्यावर झालेली ACB ची कारवाई हा एक पूर्वनियोजित कट आहे. तक्रारदाराने घेतलेला लांबचा प्रवास आणि टोल रेकॉर्डमधील तफावत हे सिद्ध करते की, हे प्रकरण केवळ पोटदुखे यांना अडकवण्यासाठी रचले गेले आहे.
विदर्भातील ६४ जण RTO मध्ये रुजू झाले आहेत, मात्र या नियुक्त्या खैरनार आणि भुयार यांच्या मर्जीने न झाल्याने आता हे अधिकारी त्यांच्या पदोन्नतीत अडथळे आणत आहेत. जे अधिकारी वसुलीला नकार देतात, त्यांना एसीबीच्या जाळ्यात अडकवण्याची किंवा बदली करण्याची धमकी दिली जात आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री या पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.
Leave a Comment