सांगली ZP मध्ये महायुतीचा करेक्ट कार्यक्रम.
सांगली, दि. १९ मार्च :-
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील विजयी झाल्या आहेत तर उपाध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली आहे.
सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत, जयंत पाटील यांच्या राजकीय खेळीमुळे महाविकास आघाडीला संख्याबळापेक्षा ४ अधिकची मते मिळाली आहेत. त्यामुळे राज्यभरात चर्चेचा विषय असलेल्या ऑपरेशन लोटसचा पार धुव्वा उडाला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीतील संख्याबळ..
जिल्हा परिषद निवडणुकीत १७ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष नंबर एकचा पक्ष ठरला होता तर त्याच्या खाली १६ जागा जिंकत भाजप दोन नंबरचा पक्ष ठरला होता. त्यानंतर काँग्रेसला ११, शिवसेना (शिंदे गट) ७, राष्ट्रवादी (अजित पवार) ६, तर शिवसेना (उबाठा) १ असे संख्याबळ होते. त्यामुळे बहुमतासाठी फक्त एका जागेची कमतरता होती.
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी भाजपचाच माणूस बसेल असे वक्तव्य भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात आले होते. मात्र जयंत पाटील यांच्या राजकीय खेळीने महायुतीला धक्का दिला आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) च्या ४ सदस्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले तर शिवसेना (शिंदे गट) चे दोन सदस्य गैरहजर राहिले.
Leave a Comment