Ads

अर्थसंकल्पातून नदीजोड व सिंचन प्रकल्पांना पाठबळ.

By Xtralarge News

March 7, 2026 8:50 pm

Ads

अर्थसंकल्पातून नदीजोड व सिंचन प्रकल्पांना पाठबळ.

मुंबई दि. ७ मार्च २०२६ ;

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारचा सादर केलेला अर्थसंकल्‍प विकसीत महाराष्‍ट्राची पायाभरणी असून, राज्‍यातील सिंचन प्रकल्‍प आणि नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी अर्थसंकल्‍पातून दिलेल्‍या पाठबळाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी स्‍वागत केले नदीजोड असून, नाशिक येथे जल माहीती केंद्र उभारण्‍याचा निर्णय महत्‍वपूर्ण असल्‍याची प्रतिक्रीया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

अर्थसंकल्‍पाबाबत बोलताना मंत्री वि‍खे पाटील म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या महत्‍वकांक्षी नदीजोड प्रकल्‍पाच्‍या पुर्ततेसाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली जलसंपदा विभागाने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. यंदाच्‍या अर्थसंकल्‍पात राज्‍यातील सर्वच नदीजोड प्रकल्‍पांच्‍या कामांना प्रशासकीय मान्‍यतेची झालेली घोषणा तसेच निधीची झालेली तरतुद दुष्‍काळमुक्‍त महाराष्‍ट्रासाठी टाकलेले मोठे पाऊल आहे.

२०४७ ची पाण्‍याची गरज लक्षात घेवून प्रतिदिन ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटर आणि शहरी भागात दरडोई १३५ लिटर पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेच्या नियोजन, कोल्‍हापूर आणि सांगली जिल्‍ह्यातील पुर निवारणासाठी जागतिक बॅकेंच्‍या मदतीने २ हजार २४० कोटी रुपयांचा प्रकल्‍प, कृष्‍णा खो-यातील पुराचे पाणी भिमा खो-यातील पश्चिम महाराष्‍ट्र आणि महाराठवाड्यातील दुष्‍काळग्रस्‍त भागात वळविण्‍याच्‍या घोषणेबद्दल मंत्री विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

जलसंपत्‍तीची डिजीटल प्रमाणित आणि ऑनलाईन माहीती प्राप्‍त करण्‍यासाठी नाशिक येथे राज्‍य जल माहीती केंद्र उभारण्‍यासाठी ७१.२० कोटी रुपयांची झालेली तरतुदही महत्‍वपूर्ण असून राज्यात पहील्यांदाच असा विचार महायुती सरकारने केला आहे.

शेतकरी कर्जमाफी बाबत महायुती सरकारने दिलेल्‍या आश्‍वासनांची पुर्तता सरकारने केली. पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा, कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर, मागेल त्‍याला सौर कृषीपंप, तसेच मुख्‍यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी ३२ हजार ७५६ कोटी रुपयांची तरतुद ही शेतक-यांना दिलासादायी ठरणार आहे.

मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु ठेवण्‍या बरोबरच एकल महीलांसाठी विशेष धोरण, २५ लाख लखपती दिदि बनविण्‍याचे उदिष्‍ठ आणि बचत गटांच्‍या उत्‍पादन विक्रीसाठी जिल्‍ह्यांमध्‍ये उमेद मॉल उभारण्‍याचा संकल्‍प या अर्थसंकल्‍प महिलांच्‍या उत्‍कर्षाकरीता परिपुर्ण ठरेल.

शिर्डी विमानतळाच्‍या विस्‍तारीकरणाच्‍या कामाला गती तसेच अगामी कुंभमेळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर अध्‍यात्मिक तिर्थक्षेत्रांचा विकास आणि पर्यटनाच्‍या वि‍कासाला या अर्थसंकल्‍पाने नवी दिशा मिळणार आहे. राज्‍याची अर्थव्‍यवस्‍था एक ट्रीलीयन अर्थव्‍यवस्‍थेकडे यशस्‍वीपणे वाटचाल करीत आहे. ही अर्थव्‍यवस्‍था पाच ट्रीलीयन डॉलर्स करणे हे राज्‍याचे उदिष्‍ठ असून, उद्योग क्षेत्रात ५० हजार स्‍टार्टअपला बळ देण्‍यासाठी केलेली तरतुद ही राज्‍यात रोजगार निर्मिेतील प्रोत्‍साहन देणार असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले.

No comments to show.

Leave a Comment