Ads

सुनेत्रा पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार..

By Xtralarge News

February 10, 2026 4:40 pm

Ads

सुनेत्रा पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार..

मुंबई दि.१० फेब्रुवारी –

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. त्याअगोदर सकाळी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले, त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरासमोर नतमस्तक झाल्या.

सिध्दीविनायक मंदिर आणि चैत्यभूमीवर गेल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जाऊन अजित पवारांच्या केबिनमध्ये प्रतिमेला अभिवादन केले. यानंतर मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी दादांच्या प्रतिमेला अभिवादन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे पहायला मिळाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, युवा नेते पार्थ पवार,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment