Ads

-

एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत..

By Xtralarge News

February 6, 2026 10:38 pm

Ads

एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत..

मुंबई, दि. ६ फेब्रुवारी :-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळेच यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनाही पुष्पगुच्छ,भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये,तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत.

अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचा गांभीर्य आपण जपू या असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत’, अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment