Ads

--

अजित पवारांचे विमान अपघातात निधन..

By Xtralarge News

January 28, 2026 2:21 pm

Ads

अजित पवारांचे विमान अपघातात निधन..
मुंबई, दि. २८ जानेवारी..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती जवळ विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीकडे विमानाने रवाना झाले होते. मात्र बारामतीत लँडिंग करताना विमान कोसळून आग लागली व त्यात अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाला.

या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांवर शोककळा पसरली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच आज शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments to show.

Leave a Comment