Ads

---

भाजपाच्या अण्णामलाईचे विधान महाराष्ट्र विरोधी..

By Xtralarge News

January 12, 2026 11:07 pm

Ads

भाजपाच्या अण्णामलाईचे विधान महाराष्ट्र विरोधी..

मुंबई, दि. १२ जानेवारी २६;

भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल केलेले विधान महाराष्ट्रविरोधी असून काँग्रेस पक्ष त्याचा निषेध करतो. पण मुख्यमंत्री व भाजपा या विधानाचे समर्थन करत आहेत का, नसेल तर त्यांनी त्याचे खंडन करावे, असे मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

सावंत पुढे म्हणाले की, अण्णामलाईला यांना जर धमक्या दिल्या जात असतील तर भाजपा सरकार व फडणवीस अपयशी आहेत असे म्हणाले लागेल, भाजपा सरकार त्यांच्याच नेत्यांना संरक्षण देऊ शकत नाहीत का असा प्रश्नही त्यांनी विचारला.निवडणूक आयोग भाजपीच बी टीम झाली आहे, भाजपा व मित्रपक्षांना ते खुली सुट देत आहेत, निवडणूक आयोग त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही. पैसे पकडले जात आहेत पण कारवाई होत नाही, असेही सावंत म्हणाले.

लाडकी बहिण योजनेवर बोलताना सचिन सावंत म्हणाले की, ही योजना बहिणींना मदत करण्याच्या भावनेतून नाही तर हा देवाण घेवाणचा व्यवहार झाला आहे, यात कोणत्याही भावना वा संवेदना नाहीत. मतांच्या जोगव्यासाठी दोन महिने लाडक्या बहिणींचे पैसे थांबवून ठेवले. हे आप्पलपोटे स्वार्थी भाऊ आहेत, बहिणीला ओवाळणी टाकतात व त्याबदल्यात मतं मागतात. हा जनतेचा पैसा आहे, देवेंद्र फडणवीस वा एकनाथ शिंदे स्वतःच्या खिशातून ते देत नाहीत असे सावंत म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment