Ads

-

निवडणूक आयुक्तांनी केली EVM ची पाहणी..           

By Xtralarge News

January 11, 2026 9:40 am

Ads

निवडणूक आयुक्तांनी केली EVM ची पाहणी..

मुंबई, दि. ११ जानेवारी:

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी विल्सन महाविद्यालयास भेट देऊन (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) सुसज्ज करण्याच्या कामाची पाहणी केली आणि उपस्थिती अधिकारी- कर्मचारी व उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

बृहन्मंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी प्रभाग क्र. 2014 ते 222 चे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे असून त्यांचे कार्यालय विल्सन महाविद्यालयात आहे. प्रभाग क्र. 2014 ते 222 साठी एकूण 467 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी एकूण 610 ईव्हीएम सूसज्ज करण्यात येत आहेत.

No comments to show.

Leave a Comment