Ads

-

ST च्या कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवापूर्वी ..

By Xtralarge News

August 25, 2025 8:02 pm

Ads

ST च्या कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवापूर्वी ..

मुंबई, २५ ऑगस्ट:

राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा वेतन गणपती उत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ तारखेपासून १० तारखेच्या दरम्यान होत असतो. परंतु यंदा गणपती उत्सव हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आल्याने केवळ वेतनामुळे त्यांचे उत्सवाच्या आनंदावर विरजण पडू नये! म्हणून राज्य सरकारला एसटीच्या विविध सवलती पोटी ची प्रतिपुर्ती रक्कम लवकर देण्याची विनंती केली. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, लवकरच एसटीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बॅक खात्यांवर त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा होईल.

No comments to show.

Leave a Comment