काँग्रेसचे साहेबराव कांबळे शिवसेनेत..
मुंबई, दि ८ जून २६ :
विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यासह उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचा दावा यावेळी शिंदे यांनी केला.
प्रवेश सोहळ्यात साहेबराव कांबळे यांच्यासह सूर्यकांता दिंडाळकर, राहुल वानखेडे, प्रफुल्ल खंदारे, विद्यानंद नलावडे, कैलास घोगरे, नामदेवराव शिंगणकर, पंजाबराव भालेराव, रवींद्र जाधव, संतोष चव्हाण यांच्यासह युवक काँग्रेस, महिला आघाडी, खरेदी-विक्री संघ आणि विविध संघटनांमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनीही प्रवेश केला.
साहेबराव कांबळे यांना काँग्रेस पक्षाने विधान परिषदेची उमेवारी दिली होती त्यांनी अर्जबी भरला होता पण अचानक त्यांनी अर्ज माघारी घेतला. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कडक कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली होती, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Leave a Comment