Ads

-

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव ‘राजगड’.

By Xtralarge News

August 22, 2025 11:08 am

Ads

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव ‘राजगड’

मुंबई, दि.२२ ऑगस्ट २५ :

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी, राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामकरण राज्य सरकारने ” राजगड” असे केले आहे. याबाबतचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राजगड या नावाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच बेल्हे गावकऱ्यांची जिव्हाळ्याची मागणी लक्षात घेऊन राजगड नावाला केंद्र सरकारच्या गृह विभागाने ६ मे २०२५ रोजी मान्यता दिली. तत्पूर्वी, वेल्हे तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने २२ नोव्हेंबर २०२१ रोजी नाव बदलाचा ठराव मंजूर केला. यावर ५ मे २०२२ रोजी पुणे विभागीय आयुक्तांनी आपला सविस्तर अहवाल शासनास सादर केला होता. १६ मार्च २०२४ रोजी नामबदलासंदर्भात शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यावर कोणत्याच हरकती व सूचना प्राप्त झाल्या नाहीत.

बावनकुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदीनुसार नाव बदलाचा अंतिम निर्णय घेण्यात आला. छत्रपतींचा मावळा असल्याचा मला अभिमान असून,महसूलमंत्री म्हणून माझ्यासाठी हा निर्णय अतिशय आनंदाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावरून त्यांचे शासन केले होते. ऐतिहासिक वारश्याशीसंबंधीत हा निर्णय राज्यातील १४ कोटी जनतेसाठीही सुखद आहे.

No comments to show.

Leave a Comment