Ads

--

सुशांतसिंगच्या शरीरात विष नाहीच !

By Xtralarge News

September 29, 2020 3:00 pm

Ads

मुंबई, दि. २९ सप्टेंबर :
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंहने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली यावर तीन महिन्यापासून सुरु असलेल्या चर्चेला आता विराम मिळेल अशी शक्यता आहे. एम्समधील डॉक्टरांच्या पथकाने दिलेल्या शवविच्छेदन अहवालात सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकराचे विष किंवा विषारी पदार्थ आढळला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते परंतु कूपर रुग्णालय आणि डॉक्टर यांच्यावरही संयश व्यक्त केला जात होता. मुंबई पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. सीबीआयने कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या शवविच्छेदनाची फेरतपासणी केली. सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट एम्सच्या डॉक्टरांकडून पुन्हा तपासण्यात आला. याचा अवहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला आहे.
१४ जून रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील घरी गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला होता. घटनास्थळी चिठ्ठी अथवा इतर काही लिखित स्वरूपात न मिळाल्याने त्याच्या मृत्यूबद्दल त्याच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला होता. यात राजकारणाने प्रवेश केला आणि सीबीआय तपासाची मागणी लावून धरण्यात आली होती.
सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची चौकशी करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात एम्सच्या पाच डॉक्टरांची समिती तयार केली गेली. २० सप्टेंबर रोजी हे पथक आपला अहवाल सादर करणार होते. आता डॉक्टरांच्या टीमचा अभ्यास पूर्ण झाला असून त्यांनी सीबीआयकडे आपला अहवाल सोपवला आहे.
मुंबई पोलिसांनीही प्रसिद्ध केलेल्या व्हिसेरा अहवालात मृत अभिनेत्याच्या शरीरात कोणतेही संशयित रासायनिक किंवा विष सापडले नसल्याचे स्पष्ट केले होते. सुशांतच्या पोस्टमार्टमनंतर व्हिसेरा तपासणीसाठी कलिना फोरेंसिक लॅबला देण्यात आला होता.

No comments to show.

Leave a Comment