Ads

-

‘सितारे जमीन पर’ च्या स्पेशल शो ला DCM एकनाथ शिंदे!

By Xtralarge News

July 17, 2025 12:55 pm

Ads

‘सितारे जमीन पर’ च्या स्पेशल शो ला DCM एकनाथ शिंदे!

मुंबई, दि. १७ जुलै :-

विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य करायला तयार असून त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर  काही निर्णय घ्यावा लागला तर तोही नक्की घेऊ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

आमिर खान निर्मित ‘सितारे जमीन पर’ या सिनेमाचा विशेष खेळ आयनॉक्स सिनेमागृहात आयोजित करण्यात आला होता.

विशेष मुलांच्या आयुष्यावर आधारित ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा तयार केला असून, त्यातून एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात आला आहे. विशेष मुलांना देखील सर्वसामान्य मुलांसोबत त्याच शाळेत शिकता यावं याबाबत या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. विशेष मुले ही इतर मुलांच्या तुलनेत अजिबात वेगळी नसून त्यांनाही इतर मुलांप्रमाणे सर्वसामान्य शाळेत शिकण्याचा तेवढाच अधिकार असल्याचे यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.

अभिनेते आणि निर्माते आमिर खान यांच्यासह दिग्दर्शक पी. एस. प्रसन्ना यांनाही हा विषय हाती घेऊन सिनेमा बनवल्याबद्दल शुभेच्छा देऊन हा अवघड विषय तितक्याच तरलतेने मांडल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अभिनेता आणि निर्माता आमिर खान, शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी, अनिल त्रिवेदी आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment