Ads

---

बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी..

By Xtralarge News

July 3, 2025 11:41 am

Ads

बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी..

मुंबई, दि.३ जुलै –

भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केली. या विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्याने लोणीकर यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले.

मी जे बोललो नाही ते मी बोललो हा आरोप केला.ह्यात राजकारण आहे असा दावा बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत केला. महाविकास आघाडीने तेव्हा आक्षेप घेतला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आमदार यांनी लोणीकर यांनी माफी मागावी ही मागणी केली.

 

बबनराव लोणीकर यांनी माफी न मागितल्याने विरोधकांनी माफी मागा शेतकऱ्यांची माफी मागा अशी घोषणाबाजी केली. या गोंधळात विधानसभेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

No comments to show.

Leave a Comment