Ads

--

आता रेस्टॉरंटही लवकरच होणार सुरू!

By Xtralarge News

September 28, 2020 6:11 pm

Ads

मुंबई, दि. २८ सप्टेंबर
करोनावर अजूनही मात करता आलेली नसताना राज्य सरकार जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. निर्बंध शिथिल करुन बाजार खुला करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एसटी बस, दुकाने, आस्थापना यानंतर आता रेस्टॉरंटही खुली होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद, पुणे, मुंबई व नागपूर येथील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तसे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, करोनाचे संकट असताना या काळात हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक सरकारसोबत असल्याचे समाधान आहे. करोनावर अजूनही लस वा औषध उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे करोनासोबत जगताना काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे. आर्थिक बाबींसाठी सरकारनं काही पावलं टाकायला सुरूवात केली आहे. रेस्टॉरंट सुरू करण्यासंदर्भात सरकारने मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment