Ads

---

ही शिवसनेची मजबुरी आहे का ?

By Xtralarge News

September 27, 2020 10:52 pm

Ads

मुंबई, दि. २७ सप्टेंबर:

शिवसेना व भाजपा सोबत 25 ते 30 वर्षे युती करुन राजकारण सुरु होते ही त्यांची मजबुरी होती का..हिंदुत्व व राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपाबरोबर शिवसेना होती याचे उत्तर संजय राऊत यांना द्यावे लागेल. तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार बनविणे म्हणजे युतीमध्ये लढलो असताना नैसर्गिक युती ही भाजपा बरोबर असताना त्यांना बाजूला ठेवुन महाविकास आघाडीशी सरकार बनविणे ही शिवसनेची मजबुरी आहे का..याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. सोयीप्रमाणे बोलणे हे जनतेला पसंत पडत नाही हे संजय राऊत यांच्या अलिकडच्या काळातील वक्तव्यावरून दिसून येते, असे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विचारला आहे.

दरेकर पुढे म्हणाले की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतीची वेळ मागितली आहे. त्यावरुन कॉंग्रसेचे नेते संजय निरुपम यांचे वक्तव्य असावे. संजय राऊत यांनी एखाद्याची भेट घेणे, सामना मध्ये संपादकीय लिहिणे व पुन्हा त्या विषयाची बातमी होणे ही मोडस ऑपरेंडी असताना बातमीमध्ये राहिले पाहिजे व काही तरी सनसनाटी केले पाहिजे अशा पध्दतीने जे राऊत यांच्या बाबतीत सुरु आहे, त्यावरुन संजय निरुपम यांनी वक्तव्य केले असावे.

संजय राऊत व देवेंद्र फडणवीस यांची बैठक फक्त सामनाच्या मुलाखतीची वेळ मागण्यासाठी होती पण आता राजकीय भूकंप होणार..सरकार पडणार, असे होणार अशा अर्थाने सनसनाटी निर्माण करायची असे जाणीवपुर्वक झाले आहे का. यामधून अश्या प्रकारचे वक्तव्य निरुपम यांनी केवळ चर्चेत राहण्यासाठी केले असावे, असेही दररोज म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment