Ads

---

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला धक्का..

By Xtralarge News

May 21, 2025 6:05 pm

Ads

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला धक्का..

सोलापूर, दि. २१ मे २५ ;
काँग्रेसमधून आणखी नेता पक्ष सोडून जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट चे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेस पक्षाला राम राम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.३१ मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये म्हेत्रे यांचा अक्कलकोटमध्ये पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार आहे.

सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेसचे चारवे॓ळा आमदार आणि गृहराज्यमंत्री राहिले आहेत.सिद्धराम म्हेत्रे हे वडिलांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे ते निकटवर्तीय आहेत. 2019 पासून दोनदा पराभव झाल्याने आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस सोडली तर सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे तर शिवसेना शिंदे गटाची ताकद अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात वाढणार आहे.

“काँग्रेसने मला भरपूर दिले पण मागच्या काही वर्षात ज्या पद्धतीने ताकद द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. कार्यकर्त्यांना त्रास होत होता त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे  शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सिद्धराम म्हेत्रे यांनी सांगितले..

No comments to show.

Leave a Comment