Ads

-

दादांचा धडाका, पहाटेच पुणे मेट्रोमध्ये!

By Xtralarge News

September 25, 2020 10:11 am

Ads

पुणे दि. 25 सप्टेंबर:
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या धडाकेबाज कामाच्या शैलीमुळे चर्चेत असतात. त्यांच्या कामाचा उरक, प्रशासनावरची पकडही मजबूत आहे. दादांच्या अशाच धडाकेबाज कामाचा अनुभव सध्या पुणे मेट्रोचे अधिकारी घेत आहेत. भल्या पहाटेच अजित पवार पुणे मेट्रोची पाहणी करण्यासाठी दाखल होतात. यापूर्वीही त्यांनी पहाटेच आपला मोर्चा पुणे मेट्रोकडे वळवून कामाची पाहणी केली व कामाला गती देण्याच्या सुचनाही केल्या.

आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना धक्का देत सकाळी सहा वाजता पुणे स्टेशनात जाऊन मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाच्या पाहणी केली.
पुणे स्टेशनसह वनाज डेपो आणि शिवाजीनगर येथील कामांची पाहणी केली.
अजित पवार यांनी पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो (वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी करून मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहीती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेनने प्रवास केला. शिवाजीनगर येथील बोगदा काम, व्हील पार्क (वानज) येथील कचरा डेपोचे अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, येथील कामाचीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. मेट्रोच्या रेणू गेरा यांनी या मेट्रो डेपो उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment