Ads

--

… अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा

By Xtralarge News

March 4, 2025 1:39 pm

Ads

… अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा.

मुंबई, दि ४ मार्च:

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख  यांच्या हत्या प्रकरणी अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. तीन महिन्यापासून सरकार मुंडे यांचा बचाव करत होते पण शेवटी राजीनामा द्यावा लागला. पण हा राजीनामा होण्यासाठी सरपंच हत्या प्रकरणातील अत्यंत क्रूर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या.

देवगिरी बंगल्यावर रात्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची एक बैठक पार पडली होती. आणि बैठकीनंतर फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची सूचना केली त्यानुसार धनंजय मुंडेंनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला.

तीन महिन्यापासून संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा चर्चेत आहे. या प्रकरणी धनंजय मुंडेंचे सहकारी वाल्मिक कराड व इतरांवर आरोप होते त्यातील काही आरोपींना अटक केली पण वाल्मिक कराड मात्र अनेक दिवस बेपत्ता होता. पोलीस त्याला अटक करु शकले नाहीत शेवटी कराड हा पुण्यात सीआयडीला शरण गेला. संतोष देशमुक यांच्या हत्येनंतर बीडमधील मुंडे व कंपूच्या खंडणी, अपहण, हत्या प्रकरणांची मालिकाच दररोज उघड होत राहिली. भाजपाचे आमादर सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, विरोधी पक्ष यांनी हा विषय लावून धरला होता.

No comments to show.

Leave a Comment