Ads

-

स्वारगेट बलात्कारातील आरोपीला तात्काळ अटक करा.

By Xtralarge News

February 26, 2025 7:48 pm

Ads

स्वारगेट बलात्कारातील आरोपीला तात्काळ अटक करा.

मुंबई, दि. २६ फेब्रुवारी २५;

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

 

अजित पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही  हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत असेही पवार म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment