Ads

--

दोन मर्सिडीज कार दिल्या की एक पद मिळायचे!

By Xtralarge News

February 24, 2025 6:33 pm

Ads

दोन मर्सिडीज कार दिल्या की एक पद मिळायचे!

नवी दिल्ली, दि. २४ फेब्रुवारी:

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज कार दिल्या की एक पद मिळायचे ,असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरील मुलाखतीत निलम गोऱ्हे यांनी हे विधान करून एकच राजकीय खळबळ उडवून दिली आहे. याच मुलाखतीत गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, शिवाजी पार्क येथे होणाऱ्या मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे.बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते असे गोऱ्हे म्हणाल्या. निलम गोऱ्हे यांच्या विधानानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले व रस्त्यावर उतरून गोऱ्हेविरोधात आंदोलन केले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेने चार वेळा विधान परिषदेचे आमदार केले व विधान परिषदेच्या उपसभापती पदाची संधीही दिली आहे, त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

 

No comments to show.

Leave a Comment