Ads

--

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ.

By Xtralarge News

February 14, 2025 1:16 pm

Ads

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई, दि १४ फेब्रुवारी ;

महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण याचे उत्तर मिळाले असून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी तर विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींने गुरुवारी या दोघांच्या नियुक्तीवर शिक्कानमोर्तब केले.

हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे घनिष्ठ सहकारी आहेत. गांधीवादी – सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून ते परिचित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. एनएसयुआयच्या माध्यमातून ते राजकीय जीवनात सक्रीय झाले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी धारण केलेली आहे.शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तथा आदिवासी गावांचे सक्षमीकरण करण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून ते प्रयत्नशील आहेत.

 

1999 से 2002 या कालावधीत जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती. २०१४ ते २०१९ या कालावधीत ते बुलढाणा विधानसभा मतदार संघातून विजयी झाले. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, पंजाब, गुजरात व मध्यप्रदेशचे सहप्रभारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. यासोबतच विविध राज्यातील विधानसभा निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे ते सदस्य राहिलेले आहेत.

No comments to show.

Leave a Comment