Ads

--

राहुल सोलापुरकरावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा.

By Xtralarge News

February 11, 2025 2:35 pm

Ads

राहुल सोलापुरकरावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा.

मुंबई दि. ११ फेब्रवारी २५ –

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही चुकीचे व अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. महापुरुषांबद्दल सतत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापुरकर यांच्यावर एट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

अभिनेते राहुल सोलापुकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐतिहासिक आगऱ्याहुन सुटकेबाबत वक्तव्य करताना अत्यंत अवमानकारक लाच शब्दाचा प्रयोग केल्याबद्दल राहुल सोलापुकरांचा रिपाईने तीव्र धिक्कार केला आहे. या वक्तव्यानंतर राहुल सोलापुरकर यांचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असुन त्या व्हिडीओत राहुल सोलापुकर हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे एकेरी वक्तव्य करीत असल्याचे दिसुन येत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार मांडला.विषमतेचे प्रतीक असणाऱ्या ब्राम्हण्यवादाचा,चातुर्वर्णाचा विरोध केला आहे. त्या ब्राम्हण्यवादातुन बाबासाहेबांना ब्राम्हण ठरविण्याचा आटापिटा राहुल सोलापुरकरांनी केला आहे.

 

No comments to show.

Leave a Comment