Ads

--

माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांचे निधन..

By Xtralarge News

December 27, 2024 12:49 pm

Ads

माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांचे निधन..

नवी दिल्ली,दि. २७ डिसेंबर ;

भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री ९.५१ मिनिटांनी डॉ. मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली, खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबून देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणली. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली होती पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही.

2004 ते 2014 अशी सवग 10 वर्षे ते देशाचे पंतप्रधान होते. 1996 साली राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. एप्रिल 2024 साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

No comments to show.

Leave a Comment