Ads

--

माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे निधन.

By Xtralarge News

December 10, 2024 9:38 pm

Ads

माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे निधन.

बेंगळूरु, दि १० डिसेंबर ;

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री एस. एम. कृष्णा यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

एस. एम. कृष्णा यांच्या निधनाने विकासाची कास धरणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी राज्याला मार्गदर्शन करण्याचे काम केले. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा अशा सर्व सभागृहात काम करताना त्यांनी, विधानसभा अध्यक्ष, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी सर्व पदे भूषविली. विद्यापीठ सुधारणा हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

No comments to show.

Leave a Comment