Ads

---

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पुण्यात.

By Xtralarge News

September 25, 2024 7:44 pm

Ads

पुणे, दि. २५ सप्टेंबर:

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरची सभा स प महाविद्यालयाच्या मैदानात होत आहे पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. बंदिस्त मंडपात सभा होणार असून किमान ५० हजार नागरिक व्यवस्थित बसू शकतील अशी व्यवस्था केली गेली आहे.

शिवाजीनगर ते स्वारगेट मार्गिकेचे लोकार्पण व विविध विकास कामांचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या निम्मित मोदीं यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
हवामान खात्याने दोन ते तीन दिवस पाऊसाची शक्यता वर्तवली असल्याने याबाबत योग्य ती काळजी घेतली असल्याचे केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

स प महाविद्यालयात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदाधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली यावेळी ते बोलत होते त्यांच्या समवेत शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांना स प महाविद्यालयात मुख्य प्रवेश द्वाराने येता येईल तसेच वाहन पार्किंगची व्यवस्था एकूण १३ ठिकाणी करण्यात आलेले आहे.

No comments to show.

Leave a Comment