Ads

---

शिंदे-फडणवीस फेक न्यूजची फॅक्टरी चालवत आहेत का ? 

By Xtralarge News

September 15, 2024 11:35 am

Ads

मुंबई , दि. १५ सप्टेंबर ;

कर्नाटक काँग्रेस सरकारने गणपतीचा अपमान केला या भाजपाच्या आय टी सेलने पसरवलेल्या खोट्या बातमीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसलीही शहानिशा न करता काँग्रेसवर तोफ डागणे त्यांच्या अंगलट आले आहे. ही बातमी चुकीची होती हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी याचा समाचार घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फेक न्यूजची फॅक्टरी चालवत आहेत का ? असा संतप्त सवाल केला.

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागत बाळासाहेब थोरात म्हणाले की, सातत्याने खोट्या बातम्या पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करणे एवढेच एकच काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण वेळ करत आहेत. अगोदर राहुल गांधींनी आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलेच नाही त्याबद्दल फेक न्यूज पसरवून आंदोलनाची नौटंकी केली आणि आता कर्नाटकात जे घडलेच नाही त्याबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील जनता सुज्ञ असून तुमच्या फेक नॅरेटीव्ह सोबत तुमचेही सरकारही उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा थोरात दिला.

 

 

No comments to show.

Leave a Comment