Ads

--

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्निलचा अचूक नेम.

By Xtralarge News

August 1, 2024 6:34 pm

Ads

मुंबई, दि. १ ऑगस्ट :

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक मिळवत महाराष्ट्राला पाहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले आहे. नेमबाज स्वप्नील कुसाळेंच्या कामगिरीवर कोल्हापुरात जल्लोष करण्यात आला तर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहेत.

पॅरीस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नीलच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिनंदन केले.

कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळेच स्वप्नील या यशापर्यंत पोहचू शकला आहे. त्याच्या गेल्या १२ वर्षांच्या मेहनतीमुळे देशाला आणि राज्याला क्रीडा क्षेत्रातील महत्वपूर्ण यश मिळाले आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, स्वप्नीलला शालेय जीवनापासून ते नेमबाजीत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या गुरुजन, प्रशिक्षक, मार्गदर्शक अशा सर्वांचे योगदान निश्चितच महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांची आठवण झाली. स्वप्नीलच्या या कामागिरीने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात उत्साह, आनंदाचे उत्साह निर्माण झाले आहे. कांबळवाडी ते पॅरीसमध्येली ऑलिंपिक पदाला गवसणी हा स्वप्नीलचा प्रवास क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या होतकरू खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

 

No comments to show.

Leave a Comment