Ads

-

पुण्यातील ‘त्या’ अपघाताची न्यायिक चौकशी करा…

By Xtralarge News

May 21, 2024 11:10 am

Ads

मुंबई, दि. २१ मे :
पुण्यात झालेल्या भीषण अपघातात पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की,पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचे सीसीटिव्ही फुटेज असूनही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली?रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली?नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही?या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे.

वडेट्टीवार यांनी आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? असा प्रश्न उपस्थित करत सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment