Ads

--

मोदींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन!

By Xtralarge News

April 17, 2024 5:04 pm

Ads

सावनेर, दि. १७ एप्रिल:

विरोधी पक्षांची आघाडी मोदी व्देषाने पिडीत आहे. मोदींना हरवायचे असा त्यांनी पण केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकेट काढणे साधी गोष्ट नाही. विरोधकांकड़े ना बॉलर आहेत ना बॅट्समन जे आहेत ते सगळे राखीव खेळाडू, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर केली. सावनेर येथे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते.

मागील १० वर्ष आपण मोदीजींची बॅटींग पाहिली. त्यांनी देशाचा विकास केला. आता पुढची पाच वर्ष पंतप्रधान मोदीजी चौकार, षटकार मारुन विरोधकांना झोडपल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. मोदीजींसाठी नेशन फर्स्ट हा अजेंडा आहे. विरोधकांकेड झेंडा नाही आणि अजेंडा नाही. विरोधक कमिशन आणि करप्शन फर्स्टसाठी काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात केलेले काम आणि काँग्रेसने ५० ते ६० वर्षांत केलेले काम जनतेसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राजनितीसाठी नाही तर राष्ट्रनितीसाठी झालाय. त्यांनी संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलंय.

परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांना मतदान करणार की अविरत देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार, हा विचार मतदारांनी करायचा आहे. विरोधकांकडे अहंकार आहे. मोदीजींकडे आत्मविश्वास आहे. अहकांर विनाशाकडे नेतो तर आत्मविश्वास विजयाकडे नेतो.

ते पुढे म्हणाले देशात राममंदीर उभे राहिले. सरकारने हिंमत दाखवून ३७० कलम हटवले. देशातील प्रत्येक नागरिकाला प्रगतीकडे नेण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे. महायुतीला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत असे त्यांनी सांगितले. रामटेक पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र १९९६ साली हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली आणि तेव्हापासून रामटेकवर भगवा फडकत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

प्रभू रामाची निशाणी धनुष्यबाण आणि महायुतीची निशाणी धनुष्यबाण आहे. काहीजण राम राम करतात मात्र त्यांची अवस्था म्हणजे मुहं मे राम बगल में छुरी अशी आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. शिवसेना नेते खासदार कृपाल तुमाने यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

No comments to show.

Leave a Comment