Ads

--

उपनगरात सुसज्ज रुग्णालय उभारणार. 

By Xtralarge News

April 8, 2024 11:43 am

Ads

मुंबई, ८ एप्रिल;

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात एसआरए सह प्रलंबित प्रश्न आहेत ते निश्चित मार्गी लावू. उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल यांनी नानावटी, लिलावती, रिलायन्सच्या धर्तीवर उपनगरात सुसज्ज असे रुग्णालय उभारणार असल्याची ग्वाही दिल्याचे भाजपा नेते प्रविण दरेकरांनी सांगितले.

जोगेश्वरी-पूर्व येथील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रविण मर्गज, विधानसभा अध्यक्ष बाबुभाई पिल्ले, दिगंबर मांजरेकर, मंगेश गुरव, रमाकांत नर, राजेंद्र महागावकर, संजय बने, विलास मेहकर, किशोर मुंडे, आकाश पाटील, अमोल पारधी, राजेश जाधव, कुणाल गावडे, अक्षता राणे, अमृता मोरे, कामिनी दळवी, उमा रमेंडकर, उर्मिला चव्हाण, पौर्णिमा भूमे, श्रद्धय सागवेकर, प्रतिभा ताम्हणकर, रेश्मा गोडके, मृणाली नाईक, दक्षा घोसाळकर, ज्योती गोसावी, मांडवकर ताई यांच्यासह जवळपास ६०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार आशिष शेलार आणि गटनेते प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

दरेकर म्हणाले की, मी जेव्हा पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला तेव्हा कधीही मनसे, राज ठाकरेंवर टीका केली नाही. हे सर्व कार्यकर्ते माझ्या तालमीत तयार झालेले आहेत. पण मी त्यांना कधीही भाजपात या असे म्हटले नाही. तुम्ही ज्या पक्षात आलात त्या पक्षात समाधान, आनंद मिळेल हा विश्वास देतो. मला विधान परिषदेवर आमदार करा असे मी पक्षाच्या नेतृत्वाला कधीच म्हटले नाही. परंतु पक्षाने, नेतृत्वाने माझ्या कामाची दखल घेऊन आमदार, विरोधी पक्षनेता, गटनेता केले. ही पक्षाची सर्वसमावेशक भुमिका आहे. सर्व प्रथम राष्ट्रहित त्यानंतर पक्ष व नंतर स्वतः हा भाजपा आणि इतर पक्षातील फरक असल्याचे दरेकर म्हणाले. तसेच

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तम कामं करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे लोकप्रिय नेते नेतृत्व करताहेत त्यामुळे सर्व पक्षातील लोकांना भाजपात गेले पाहिजे असे वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी वेगळा विश्वास जनतेत आहे. त्यामुळे पक्षाचे कार्य करा तुम्हाला मान, सन्मान देण्याचे निश्चितपणे कामं होईल. प्रविण मर्गज हे सहकारात माझ्यासोबत कामं करतात. त्यांनी महिलांसाठी किमान १० संस्था स्थापन कराव्यात. त्या संस्थांद्वारे रोजगार निर्माण करा, असे आवाहनही दरेकरांनी केले. आगामी निवडणुकीत जोगेश्वरी विधानसभेवर भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

 

No comments to show.

Leave a Comment