Ads

--

मतभेद विसरून एकत्र या व भाजपाचा पराभव करा.

By Xtralarge News

April 2, 2024 8:08 pm

Ads

वर्धा, दि.२ एप्रिल :

देशाच्या संविधानावर हल्ला होण्याची स्थिती आहे, यातून कोट्यवधी लोकांची सुटका करायची असेल तर मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित राहणे आणि एक मोठी शक्ती दाखवून त्या माध्यमातून भाजप आणि भाजपा विचाराच्या लोकांचा पराभव करण्याचा निश्चय सर्वांनी घेतला आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

वर्धा हे स्वातंत्र्याच्या आंदोलनाची एक इतिहासिक भूमी आहे. वर्धा ते महात्मा गांधी यांचे वास्तव्य होते. या वास्तव्यामध्ये जो काही संदेश दिला आहे त्याचा स्मरण करणे आणि जी काही चुकीची प्रवृत्ती असेल तिच्यावर तुम्हाला आणि मला मात करायची आहे. त्यासाठीच एक कर्तुत्वान गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करत आहे. असा जागरूक उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध पवार पक्षाच्या वतीने अमर काळे यांच्या रूपात देण्यात आला आहे. त्यांच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभे रहावे असेही शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वर्धा लोकसभा मतदारसंघात करिता उमेदवार म्हणून घोषित केलेले अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भरण्यात आला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment