Ads

--

मैं तो तुफानों से बगावत कर के आया हूँ!

By Xtralarge News

February 18, 2024 6:42 pm

Ads

मैं तो तुफानों से बगावत कर के आया हूँ!

लोणावळा, दि. १८ फेब्रुवारी:

भाजपा कसे खोटे बोलत आहे, जनतेची फसवणूक करत आहे हे लोकांमध्ये जाऊन सांगा, कुठेही कमी पडू नका. आघाडीला विजयी करुन भाजपाचा पराभव करावा लागणार आहे. वातावरण काँग्रेस व मविआच्या बाजूने आहे. नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करु शकतो, हे लक्षात घ्या असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

 

लोणावळ्यात दोन दिवसाच्या शिबिरातून चांगले बौद्धीक व वैचारिक मंथन झालेले आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान बाळगून काम करा. काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्यात एकजूट असला पाहिजे. सर्व सेल, फ्रंटल संघटना सर्वांनी सोबत असले पाहिजे. पक्षाच्या अजेंड्यावरच सर्वांनी काम केले पाहिजे व काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या अजेंड्यानुसारच काम करा आणि लोकसभेची लढाई जिंकायची आहे हा संकल्प घेऊनच जा. आता आपल्याकडे वेळ नाही, युद्ध पातळीवर काम करायचे आहे असे सांगत शेवटी नाना पटोले यांनी “तुम मुझे आंधीओंका डर बताते हो, मैं तो तुफानों से बगावत कर के आया हूँ”. हा शेर ऐकवून भाषण संपवले.

 

No comments to show.

Leave a Comment