Ads

-

माजी मंत्री रोहिदास पाटील व्हेंटीलेटरवर..

By Xtralarge News

February 9, 2024 8:56 pm

Ads

धुळे, दि. ९ फेब्रुवारी;

माजी मंत्री, खान्देशचे नेते रोहिदास पाटील हे आपल्या मुलीकडे कोल्हापूर येथे गेले असतांनाच गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे फूफ्फूस कमी क्षमतेने काम करत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.

 

कोल्हापूर येथील साई कार्डीयाक सेंटर येथील आयसीयूत डॉ. चंद्रशेखर पाटील आणि कोल्हापूर येथील फूफ्फूस तज्ञ त्यांच्यावर उपचार करत आहेत.पहिल्या आठवड्यात त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला.मात्र कालपासून प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांचे सुपूत्र विनय पाटील, आमदार कुणाल बाबा पाटील हे सोमवारपासून कोल्हापूर येथेच आहेत. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी रुग्णालयात न येता आपल्या घरीच माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment