Ads

--

बॉलिवूडमधील ड्रग घेणारे ‘ते’ २५ जण कोण?

By Xtralarge News

September 8, 2020 8:32 pm

Ads

मुंबई, दि. ८ सप्टेंबर २०२०:
सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने तपासाची सुत्रे हाती घेतली. याच अँगलने रियाची चौकशी केली जात होती सुरुवातीला नकारघंटा वाजवणाऱ्या रियाने अखेर ड्रग्ज घेत असल्याचे कबुल तर केलेच पण बॉलिवडूमधल्या २५ जणांची नावेही घेतली. आता हे २५ जण एनसीबीच्या रडारवर आलेत.

रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप फॉरेन्सिक तपासणीला पाठवण्यात आले होते. यात रिया आणि शौविक २०१७ पासून ड्रग गेममध्ये सामिल असल्याचे दिसून आले. दोघांचे फोन कॉल, चॅट्स आणि मेसेजवरून रिया अनेक ड्रग्ज डीलरच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. रियाशिवाय शौविक, सॅम्युअल आणि दिपेश यांनीही सुशांतसाठी ड्रग्स विकत घेतल्याचे मान्य केले आहे.
बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्ज घेतले जाते अशी चर्चा होत असेच. सुशांतसिंग प्रकरणात ड्रग कनेक्शन उजेडात आल्यानंतर रियाची यासंदर्भात एनसीबीने चौकशी केली. ती तर जाळ्यात अडकलीच पण जाता जात तीने इतरांचीही नावेही सांगितले…आता या चौकशीतून बडे मासे निघतात, का फुसका बार निघतो हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

No comments to show.

Leave a Comment