नरेंद्र मोदी-शिवाजी महाराज तुलनाच अयोग्य..
पुणे,दि. २३ जानेवारी;
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोडफोड करुन मांडण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे व आजही केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी कधीच होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते व राहतील आणि ते आमचे दैवत आहेत व त्यांचे स्थान अबाधितच राहिल,असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आली. या प्रकाराचा नाना पटोले यांनी समाचार घेतला.
मराठा आरक्षणावर पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. देवेंद्र फडणवीस यांनी एका महिन्यात आरक्षण देतो असे जाहीरपमे सांगितले होते, आज त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे तर मग मराठा समाजाला फडणवीस आरक्षण का देत नाहीत? मनोज जरांगे पाटील यांचा प्रश्न भाजपा सरकारने तातडीने सोडवला पाहिजे पण सरकार मुद्दामपणे पाप करत आहे. मराठा समाज व ओबीसी समाजात फूट पाडण्याचे काम भाजपा करत आहेत असेही नाना पटोले म्हणाले.
Leave a Comment