Ads

--

काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे पंतप्रधान व्हावेत का ?

By Xtralarge News

December 21, 2023 10:55 am

Ads

काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे पंतप्रधान व्हावेत का ?

हिंगोली,दि. २१ डिसेंबर ;

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारे कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे त्यांचे वडिल कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे इंडी आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावेत का? असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केला. असे असेल तर त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान मान्य आहे का? असाही प्रतिप्रश्न बावनकुळे यांनी केला.

महाविजय-२०२४ अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी हिंगोली लोकसभा क्षेत्राचा दौरा केला. यावेळी ते हिंगोली येथे पत्रकारांशी संवाद केला. बावनकुळे म्हणाले, विधीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्या कुटुबांना लाभ व्हावा यासाठी एसओपी तयार करण्याबाबत सांगितले आहे. त्यानुसार कार्यवाही होईल व त्याचा फायदा मिळेल. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्र व सर्व पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पाठिशी आहेत. जरांगे यांना अपेक्षित आरक्षण मिळावे, सोबतच ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी महायुती सरकारकडून घेतली जात आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री केंद्राकडून मदत मिळावी यासाठी दिल्ली येथे जात आहेत. राज्यात अवकाळी व दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केंद्राकडून व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांच्याविषयी करण्यात आलेल्या व्यंगात्मक टीकेच्या विरोधात भाजपा गुरुवारी राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

केंद्र सरकारकडून जनगणना करताना एससी,एसटी व इतर अशी केली जाते. मात्र स्थानिक व राज्य स्तरावर इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी राज्य सरकारने पुढकार घ्यावा. जात निहाय डेटाच्या माध्यमातून कोणता समाज मागास आजे व त्यांच्या विकासासाठी काय करता येईल याविषयी सरकार निर्णय घेऊ शकते. बिहारमध्ये जनगणना झाली नाही तर त्यांनी जातीचा डेटा गोळा केला आहे.

 

No comments to show.

Leave a Comment